|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » कर्नाटकातील शिष्टमंडळ दिल्लीत दाखल

कर्नाटकातील शिष्टमंडळ दिल्लीत दाखल 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : 

कुमारस्वामी यांच्या सरकारचा शेवट झाल्यानंतर आता भाजपकडून कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षाचे दिग्गज नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी बैठका सुरू आहेत. अशावेळी राज्यातील भाजपचे काही नेते गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये जगदीश शेट्टर, बसवराज बोम्मई, अरविंद लिंबावली यांचा समावेश आहे.

भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यास कर्नाटकातील एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्ता स्‍थापन करण्यासाठी काय करायचे यासंबंधी या बैठकीत चर्चा होणार आहे.

 

Related posts: