|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू

गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /ठाणे : 

प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून 30 वषीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज सकाळी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका 26 वषीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिव वल्लभ कुमार असं या तरुणाचं नाव आहे.

शिव वल्लभ कुमार हा 26 वर्षांचा तरुण डोंबिवलीत राहत होता. मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे आज तो कामावर निघाला होता. कर्जतकडून येणारी 8 वाजून 50 मिनिटांची जलद लोकल त्यानं पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. डोंबिवली-कोपरदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. डाऊन दिशेकडून येणाऱया लोकलच्या मोटरमननं या घटनेची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर काही वेळाने रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिव वल्लभ कुमारचा मृतदेह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात नेला. तेथे नातेवाईकांनी गोंधळ घातला. लोकलमधील गर्दीमुळं रोज अपघात होत आहेत. अनेकांचा बळी जात आहे. मात्र, अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

 

Related posts: