|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » 8 मिनिटाला बेपत्ता होतेय एक मूल

8 मिनिटाला बेपत्ता होतेय एक मूल 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

मोठय़ा संख्येत मुलमुली बेपत्ता होण्याचा मुद्दा राज्यसभेत गुरुवारी उपस्थित झाला आह. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाने एक विशेष विभाग स्थापन करावा अशी मागणी खासदारांनी केली आहे. मागील 10 वर्षांमध्ये 7 लाखांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. दिल्ली तसेच अन्य राज्यामंध्ये मुलांच्या बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. यातील 60 टक्के मुलांचा शोध लागला नसल्याचे विधान काँग्रेस खासदार टी. सुब्बीरामी रेड्डी यांनी केले आहे.

काही मुलांचा शोध लागतो तर काही जणांचा सुगावा लागत नाही. बेपत्ता झालेल्या मुलांना भिक्षेकरी म्हणून किंवा देहव्यापारात लोटले जाते. रोजगाराच्या शोधात एका राज्यातून दुसऱया राज्यात जाणाऱया स्थलांतरितांच्या मुलांना अधिक लक्ष्य केले जात असल्याचे रेड्डी म्हणाले.

दर 8 मिनिटांनी एक मुल देशात बेपत्ता होत असल्याची माहिती एनसीआरबीने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी ‘सहाय्यता विभाग’ निर्माण करण्याचा निर्देश दिला आहे. तर सरकारने अशा मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन स्माई’ चालविले असले तरीही मुलं बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच आहेत.

 

Related posts: