|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » ओपेल्काकडून जॉन इस्नेर पराभूत

ओपेल्काकडून जॉन इस्नेर पराभूत 

वॉशिंग्टन :

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍटलांटा खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या नवोदित रिले ओपेल्काने आपल्याच देशाच्या अनुभवी आणि या स्पर्धेत दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया जॉन इस्नेरला पराभवाचा धक्का दिला. बुधवारी या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात 21 वर्षीय ओपेल्काने जॉन इस्नेरचा 7-6 (7-2), 6-7 (5-7), 7-6 (7-5) असा पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या फेब्रुवारीमध्ये न्यूयॉर्क टेनिस स्पर्धेत तसेच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत बिगर मानांकित ओपेल्काने इस्नेरला हरविले होते.

 

Related posts: