|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बांगलादेश पूरबळींचा आकडा 100 वर

बांगलादेश पूरबळींचा आकडा 100 वर 

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशमध्ये पूरबळींची संख्या शुक्रवारी 100 च्या वर पोहचली. देशातील विविध भागात महापुरामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 20 हून अधिक जण मृत्युमुखी पडले असून, यावर्षीची ही मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. पुरात वाहून गेल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला असला तरी दरड कोसळणे, साप चावून आणि वीज पडून अनेकांचा बळी गेला आहे. जामालपूरमध्ये पूरग्रस्तांची बोट उलटून सहा मुली वाहून गेल्या. देशातील 26 जिल्हे पूरबाधित झाले आहेत. 10 जुलैपासून आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाच लाख नागरिकांना फटका बसला आहे.

 

Related posts: