|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » पक्ष सोडणारे नेते भरडय़ा पीठासारखे : रोहित पवार

पक्ष सोडणारे नेते भरडय़ा पीठासारखे : रोहित पवार 

ऑनलाईन टीम / पुणे :

राष्ट्रवादी सोडून जाणारे नेते हे भरडय़ा पीठासारखे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे. फेसबुकवर एक पोस्ट टाकत त्यांनी पक्ष सोडणाऱयांवर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून धास्ती घेतलेले काही राष्ट्रवादीतील नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अशा नेत्यांचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. ‘भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेले कधीही चांगलेच असते. पक्षाने संधी दिली पण संधीसाधू लोक स्वार्थासाठी पक्ष सोडून जातात. संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असे लावले जाते आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. काही माणसे सोडून गेली म्हणून पक्ष संपत नसतो, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Related posts: