|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महालक्ष्मीमध्ये 100 हून अधिक प्रवाशी कराडचे

महालक्ष्मीमध्ये 100 हून अधिक प्रवाशी कराडचे 

वार्ताहर/ कराड

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱया महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड रेल्वे स्टेशनला दररोज किमान शंभर ते दीडशे प्रवासी उतरतात. शनिवारी बदलापूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये कराडला उतरणाऱया प्रवाशांची कराड रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली नसली, तरी या रेल्वेत कराडला उतरणाऱया प्रवाशांची संख्या शंभरहून अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दररोज रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी व्हीटी स्टेशनवरून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी कराड स्टेशनवर पोहोचते. महालक्ष्मी एक्सपेसमध्ये सातारा, कराड, सांगली व कोल्हापूर आदी शहरातील प्रवाशांची संख्या जास्त असते. कराड रेल्वे स्टेशनवर दररोज किमान शंभर ते दीडशे प्रवासी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरत असतात. मात्र, शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूरनजीक पुराच्या पाण्यात अडकल्याने कराडला उतरणारे प्रवासीही रेल्वेत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कराड रेल्वे स्टेशन प्रशासनाशी संपर्क साधला असता, येथे उतरणाऱया प्रवाशांची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

Related posts: