|Thursday, December 5, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘दे धक्का’चा सिक्वल येतोय

‘दे धक्का’चा सिक्वल येतोय 

11 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱया ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच मोठय़ा पडद्यावर येतोय. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘वेलकम टू लंडन’ असा बोर्ड हातात घेऊन एक महिला उभी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात लंडनचे काय कनेक्शन असणार हे पाहणे रंजक ठरेल. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार ‘दे धक्का 2’मध्येही असतील. मात्र, त्यांच्या बरोबरीने आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 3 जानेवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून अमेय खोपकर निर्माते आहेत.

Related posts: