|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » यशोमनची सेटवर मेहनत

यशोमनची सेटवर मेहनत 

मानस आणि वैदेहीची प्रेमकहाणी असलेल्या झी युवावरील ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचे प्रेम प्रेक्षकवर्गाला नेहमीच आकर्षित करते. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तरुणांच्या गळय़ातला ताईत बनलेला अभिनेता यशोमन आपटे गेले काही दिवस जोरात काम करतोय. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी महिन्यातले 25-26 दिवस तो सेटवरच असतो. गेल्या अडीच वर्षात त्याने फारशी कधी सुटीही घेतलेली नाही. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे लवकरच ही मालिका 700 भागांचा टप्पा गाठणार आहे. या निमित्ताने मालिकेतले 19 वे गाणे सुद्धा यशोमानवर चित्रित होणार आहे.

Related posts: