|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड येणार

मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड येणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोदी सरकार-2 ला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड जारी करण्यात येणार आहे. या रिपोर्टमध्ये महत्त्वाचे प्रकल्प आणि नवीन प्रकल्पाचे अपडेट दिले जाणार आहेत.

सरकारच्या दुसऱया टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला पूर्ण झालेला प्रकल्पाचे अपडेट आणि नवीन प्रकल्पाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात यावी, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे. त्यानुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयाच्या सचिवांना आपल्या विभागाच्या कामांचा अहवाल तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. एखादा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रकल्प काय आहे, केव्हा आणि कधी पूर्ण होईल, याची संपूर्ण माहिती या अहवालात देणे बंधनकारक आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांकडूनही त्यांच्या खात्यातील मोठय़ा प्रकल्पांची यादी मागविली आहे. संबंधित मंत्रालयाकडून योजनांची माहिती त्यासाठी लागणारा खर्च आणि पैसे कुठून येणार याची माहिती द्यावी लागणार आहे.

Related posts: