|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » कर्नाटकात सत्ता भाजपचीच : येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

कर्नाटकात सत्ता भाजपचीच : येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव 

 

 

ऑनलाइन टीम /बंगळुरू :

भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधनसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधनसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाटय़ काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शुक्रवारी राजभवनातील सोहळय़ात राज्यपालांनी येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. येडियुरप्पांना आज, सोमवारी विधनसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. अखेर या शक्तिपरीक्षेत येडियुरप्पा उत्तीर्ण झाले. त्यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

 

Related posts: