|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » शीलंकेचा बांगलादेशवर वनडे मालिका विजय

शीलंकेचा बांगलादेशवर वनडे मालिका विजय 

वृत्तसंस्था/ कोलंबो

यजमान श्रीलंकेने बांगलादेशविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. येथे झालेल्या दुसऱया सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 8 बाद 238 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 44.4 षटकांत 3 बाद 242 धावा जमवित हा सामना सात गडय़ांनी जिंकला. लंकेच्या अविष्का फर्नांडोला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या मालिकेत पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱया सामन्यातही बांगलादेशची फलंदाजी कोलमडली. बांगलादेशच्या डावात मुश्फिकरने 110 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 98 धावा जमविल्या. त्याचे आठवे वनडे शतक केवळ दोन धावांनी हुकले. मुश्फिकर आणि मेहंदी या जोडीने सातव्या गडय़ासाठी 84 धावांची भागिदारी केली. मेहंदीने 46 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा जमविल्या. सौम्या सरकारने 11, तमीम इक्बालने 19, धनंजयने 12, मेहमुदुल्लाने 6, शबीरने रेहमान 11 धावा जमविल्या. मुश्फिकर डावातील शेवटच्या षटकांत 5 व्या चेंडूवर बाद झाला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेने 44.4 षटकांत बिनबाद 242 धावा जमवित विजय नोंदविला. लंकेच्या अविष्कार फर्नांडोने 75 चेंडूत 82, अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 52 धावा जमविल्या. फर्नांडो आणि करूणारत्ने यांनी पहिल्या गडय़ासाठी 71 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या मेहंदीने करूणारत्नेचा 15 धावांवर  त्रिफळा उडविला. कुशल परेराने 34 चेंडूत 30 धावा जमविल्या. मॅथ्यूजने शब्बीर रेहमानच्या गोलंदाजीवर विजयी चौकार मारून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने 57 चेंडूत नाबाद 52 तर मेंडीसने नाबाद 41 धावा जमविल्या. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 96 धावांची भागिदारी केली. बांगलादेशतर्फे मुश्ताफिजुरने 50 धावांत 2 गडी बाद केले. या मालिकेतील गेल्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात लंकेने बांगलादेशचा 91 धावांनी पराभव केला होता. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलंबोत बुधवारी खेळविला जाईल.

संक्षिप्त धावफलक- बांगलादेश 50 षटकांत 8 बाद 238, श्रीलंका 44.4 षटकांत 3 बाद 242 (फर्नांडो 82, मॅथ्यूज नाबाद 52, मेंडीस नाबाद 41, कुशल परेरा 30, करूणारत्ने 15, मुश्ताफिजुर 2/50).

Related posts: