|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » leadingnews » सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला 

ऑनलाईन टीम / मंगळुरू :

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आज पहाटे मंगळुरूतील नेत्रावती नदीत सापडला.

सोमवारी सायंकाळपासून सिद्धार्थ बेपत्ता होते. त्यांनी सीसीडीच्या संचालकांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांच्या आत्महत्येचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलीस मागील 36 तासांपासून नेत्रावती नदीपात्रात त्यांचा शोध घेत होते. तपासादरम्यान, मंगळुरूतील होजी बाजाराजवळ नेत्रावती नदीच्या पात्रात सिद्धार्थ यांचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यांचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सिद्धार्थ यांनी व्यवसायात आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी संचालकांना लिहिलेल्या पत्रात ‘आपण एक ब्रँन्ड उभा केला. मात्र, तो सांभाळू शकलो नाही. माझ्यावर प्रचंड दबाव आणि लोकांचे कर्ज आहे.  मी अपयशी ठरलो, त्यामुळे मला माफ करा’, अशा आशयाचा उल्लेख होता.

 

Related posts: