|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » अस्तित्व धोक्यात आल्याने नाईकांचा भाजप प्रवेशाचा घाट

अस्तित्व धोक्यात आल्याने नाईकांचा भाजप प्रवेशाचा घाट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विरोधी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करत आहेत, ही बाब भाजपसाठी चांगली आहे. मात्र, गणेश नाईक यांचे अस्तित्त्व धोक्यात आल्यानेच ते भाजपात प्रवेश करत आहेत, असे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱयांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे. साताऱयाचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईकांसह नवी मुंबईतील काही नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला. संदीप नाईकांनर गणेश नाईकही भाजपात येतील, अशी मुख्यमंत्र्यांना आशा आहे. त्यामुळे राजकारणातल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्धी आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.

म्हात्रे म्हणाले, कालपर्यंत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे लोक भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपच विकास करुन शकतो ते त्यांना समजले असावे. मी 25 वर्षं संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले. नाईकांचे राजकीय अस्तित्वच धोक्मयात आल्याने ते भाजपात येत आहेत. जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. माझा मतदारसंघ माझ्यासाठी अबाधित राहील, हे फडणवीसांनी सांगितल्याचा उल्लेख मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

Related posts: