|Friday, December 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » अबब… प्रियांकाचा बर्थडे केक 3 लाख 45 हजार रुपयांचा

अबब… प्रियांकाचा बर्थडे केक 3 लाख 45 हजार रुपयांचा 

 

ऑनलाईन टीम /वॉशिंग्टन : 

प्रियांका चोप्राने 18 जुलैला अमेरिकेत मियामीमध्ये पती निक जोनास, आई मधुमालती चोप्रा आणि बहीण परिणिती चोप्रा यांच्या उपस्थितीत आपला 37 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी गडद लाल रंगाच्या पोषाखात प्रियांका खुलून दिसत होती. तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केकही तिच्या पोषाखाला मिळता-जुळता असा लाल व सोनेरी रंगाचा तसेच अनेक मजल्यांचा उंच असा आकर्षक केक होता. हा केक तब्बल 5 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 लाख 45 हजार रुपयांचा होता!

प्रियांकाच्या वाढदिवसासाठी निकने आणलेला हा केक बनवण्यासाठी 24 तास लागले. निकला प्रियांकाच्या पोषाखासारखाच केक हवा होता. तिला सोनेरी रंगातील नक्षीकाम आवडते हे त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने तशी ऑर्डर देऊन ठेवली होती. मियामीतील एका प्रसिद्ध बेकरीत हा पाच थरांचा केक बनवण्यात आला. तो चॅकलेट आणि व्हेनिलापासून बनवलेला होता.

 

Related posts: