|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डॉ.विजयमाला पुजारी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

डॉ.विजयमाला पुजारी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार 

प्रतिनिधी/  बेळगाव

अशोकनगर येथील कामगार राज्य विमा (ईएसआयएस) हॉस्पिटलतर्फे बुधवारी निवृत्तीनिमित्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयमाला पुजारी व पारिचारीका सुवर्णा पत्तार यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर नूतन अधीक्षक डॉ. प्रकाश पोंडे, शिशु विभाग अधीक्षक लिना डिसोजा, जगदीश पाटील, अण्णासाहेब हेगडे उपस्थित होते.

यावेळी बेळगाव ईएसआय हॉस्पिटलमध्ये 15 वर्षे सेवा बजावलेल्या डॉ. विजयमाला पूजारी व पारिचारीका म्हणून 35 सेवा केलेल्या सुवर्णा पत्तार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तरूण भारततर्फे सागर भालाचार्य यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना डॉ. पूजारी म्हणाल्या हॉस्पिटलमधील सगळय़ानीच सहकार्य केल्यामुळे उत्तम सेवा बजावू शकलो. तसेच हॉस्पिटलमधील विविध विभागातील सहकारी उत्तमरित्या सेवा बजावत असल्यामुळे रूग्णांना ईएसआयचा उपयोग चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगितले. डॉ. विजयमाला यांच्या जागी आता नुतन वैद्यकिय अधिक्षक म्हणून डॉ. प्रकाश पोंडे यांनी पद्भार स्विकारला आहे.

Related posts: