|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा कर्मचाऱयांचा सत्कार

मनपा कर्मचाऱयांचा सत्कार 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऊन पावसात स्वच्छतेचे काम करणाऱया कर्मचाऱयांच्या निवृत्तीनिमित्त बुधवारी आरोग्य विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी शिवाजी लाखे यांचाही सत्कार करून निरोप देण्यात आला.

शहरातील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच भटकी जनावरे पकडण्याची मोहिम अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून राबविण्यात येते. या पथकामध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले शिवाजी लाखे निवृत्त झाले आहेत. अमिताभ बच्चन हेअर स्टाईल केली असल्याने त्यांची शहरात व मनपा वर्तुळात ‘बच्चन’ म्हणून ओळख होती. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असलेले लक्ष्मण चन्नहोलर व चारम्मा देसय्या निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त कलामंदिर बीटच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक पंढरी परब, आनंद देशपांडे, स्वच्छता निरीक्षक रवि मास्तीहोळी आदींसह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

 

Related posts: