|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णवर यांचा

प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णवर यांचा 

प्रतिनिधी/ बेळगाव

पी. ए. मेघण्णावर यांनी आतापर्यंत अनेक उच्चपदावर काम केले आहे. आपल्या 35 वर्षाच्या कार्यकाळात ते एक शिस्तप्रिय व नियोजित वेळेत काम काटेकोरपणे पूर्ण करणारे अधिकारी म्हणून नावाजले गेले. मेघण्णावर हे विविध पदावर काम करत असताना आपल्या सहकारी अधिकाऱयांना योग्य मार्गदर्शन करून कामाची जबाबदारी सोपवत असत, असे मत गदगचे जिल्हाधिकारी एम. जी. मठपती यांनी व्यक्त केले.

जिल्हास्तरीय बेळगाव व महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी होते.

व्यासपीठावर धारवाड जिल्हाधिकारी दीपा चोळण, एच. जी. राघवेंद्र, पोलीस आयुक्त डॉ. एस. बी. लोकेशकुमार, बागलकोट जिल्हाधिकारी रामचंद्र आर., बिजापूर जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील आदीसहित विविध जिल्हाधिकारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बोदेप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर चिक्कोडी उपविभाग अधिकारी रवी करलींगण्णावर यांच्या हस्ते पी. ए. मेघण्णावर यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी त्यांचे सहकारी अधिकारी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्हास्तरीय, बेळगाव महानगरपालिका, विविध संघटनांच्यावतीने पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी विविध जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, सहकारी अधिकारीवर्ग उपस्थित होते.

Related posts: