|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा खून

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा खून 

प्रतिनिधी/ बेळगाव

सोमवार व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्गामध्येही पाणी साचले आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. भुयारी मार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

जिल्हा न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे जाण्यासाठी या मार्गाची उभारणी केली. मात्र, वकिलांना विश्वासात न घेता या मार्गाची उभारणी केली आहे. त्यामुळे वकिलांनी या मार्गाचा अवलंब करणे टाळले आहे. आता या भुयारी मार्गामध्ये पावसाळय़ात पाणी साचून राहत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भुयारी मार्गामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.

या भुयारी मार्गामध्ये कचरा तसेच इतर साहित्य टाकले जात आहे. आता या भुयारी मार्गाला मुतारीच बनविली गेली आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार आहे.