11 वर्षांच्या संसारानंतर दिया पतीपासून विभक्त

ऑनलाईन टीम /मुंबई :
बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विटरच्या माध्यमातून आपण पतीपासून विभक्त झाल्याचे सांगितले आहे. अकरा वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त झाल्याचा निर्णय तिने सोशल मीडियावर जाहीर केला आहे. विभक्त होण्याचा निर्णय आम्ही संगनमताने घेतला असल्याचेही तिने स्पष्ट केले.
अकरा वर्षे एकमेकांसोबत संसार केल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संसार मोडला असला तरी दोघांमधली मैत्री कायम राहील, आमचे मार्ग वेगळे आहेत. मात्र, आतापर्यंतच्या प्रवासासाठी आम्ही दोघंही एकमेकांचे ऋणी आहोत.
Related posts:
Posted in: मनोरंजन