|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भक्तपरतंत्र सदाचा

भक्तपरतंत्र सदाचा 

कृष्ण निंदा करताना रुक्मी पुढे म्हणाला-

एक म्हणती नंदाचा ।  एक म्हणती वसुदेवाचा ।

ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ।

रुक्मी म्हणाला-या कृष्णाला एक बाप नाही. कुणी म्हणतात हा नंदाचा पुत्र आहे, तर कुणी म्हणतात हा वसुदेवाचा पुत्र आहे. ज्याच्या बापाचाच पत्ता नाही त्याच्या कुळाचा तरी पत्ता कसा लागायचा?

त्यावर राजा भीष्मक म्हणाला-अरे वेडय़ा! कृष्णाला दोन पिता आहेत यात काय नवल? शास्त्राने पाच पिता सांगितले आहेत. जन्मदाता, अन्नदाता, विद्यादाता, कन्यादाता व भयत्राता हे पाचही पिता मानावेत. वसुदेव हा कृष्णाचा जन्मदाता पिता आहे. नंद हा अन्नदाता पिता आहे. सांदिपनी हा विद्यादाता पिता आहे. मी त्याला आता माझी कन्या देऊन त्याचा पिताच होणार आहे. तो स्वतःच सर्वांचा भयत्राता पिता
आहे.

मुळींचा नाहीं जन्मपत्र । कवण जाणे कुळ गोत्र ।

कृष्ण नव्हे जी स्वतंत्र । भक्तपरतंत्र सदाचा ।

रुक्मी म्हणाला-या कृष्णाची मुळात जन्मपत्रिकाच नाही. याला कुळ नाही, गोत्र नाही. तो स्वतंत्र नसून परतंत्र आहे. त्यावर भीष्मक म्हणाला-कृष्ण मुळात निर्गुण निराकार ब्रह्म असल्याने त्याचे कुळ, गोत्र, पत्रिका असेल कशी? तो अजन्मा आहे. जो जन्माला येत नाही त्याची पत्रिका कोण करणार? पण या जन्मीची पत्रिका गर्गाचार्यांनी केली आहे आणि उत्तम भविष्य वर्तिले आहे. तो भक्तपरतंत्र आहे हे बरेच झाले. रुक्मिणी त्याची भक्त आहे. तो हिच्या ताब्यात राहील.

कर्म पहातां परद्वारिं ।  गोरसाची करी चोरी ।

धरितां न धरावें निर्धारिं । चोरटा हरी चित्ताचा ।

रुक्मी म्हणाला-हा कोणते काम करतो? तर हा परक्मयाच्या घरी गोरसाची चोरी करतो. हा चोरटा आहे!

भीष्मक म्हणाला-तो गोरसाची चोरी करतो, ही चोरी नाहीच मुळी. हरी हा ब्रह्मांडाचा खरा मालक आहे. गाईला दूध ईश्वराने दिले आहे, ते घेणे हा वासरांचा आणि प्रत्येक मुलाचा अधिकार आहे म्हणूनही ती चोरी नाही. वास्तविक तो भक्तांच्या चित्ताचीच चोरी करतो. तो कुणालाही सापडत नाही कारण कोणत्याही प्रमाणाचा तो विषय नाही. तो इंद्रियातीत आहे, मग कसा सापडणार? तो सापडतो फक्त भक्तांच्या हृदयांत.

गाईपाठीं धांवता ।  पळू शिकला तो तत्त्वतां ।

काळयवनापुढें पळतां । झाला रक्षिता मुचुकंद ।

कृष्ण वीर नव्हे गाढा ।  पळाला जरासंधापुढां ।

भेणें समुद्राचिया आगडा । माजी दुर्ग बसविले ।

रुक्मी म्हणाला-तुम्ही कृष्णाला वीर म्हणता, पण तो वीर नव्हे. गाईंपाठी धावता धावता तो पळायला शिकला. कालयवनाला भिऊन तो पळाला. त्याचे रक्षण मुचकुंदाने केले. कृष्ण काही मोठा पराक्रमी वीर नाही. जरासंधाला घाबरून कृष्ण मथुरेतून पळाला आणि त्याने समुद्राच्या आत किल्ला उभारला व त्यात लपून राहिला.

Related posts: