|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » उद्योग » मोतीलाल ओसवालला 129 कोटींचा नफा

मोतीलाल ओसवालला 129 कोटींचा नफा 

वृत्तसंस्था /मुंबई :

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत 129 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 25 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचे एकत्रित उत्पन्न 655 कोटी रुपयांवर झेपावले असून वित्त आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायाने भांडवली बाजार व्यवसायापेक्षा नफ्यात अधिक योगदान दिलेले आहे. वित्त आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायाचा नफ्यात 32 टक्के तर भांडवली बाजार व्यवसायाचा 28 टक्के वाटा आहे. त्यापाठोपाठ म्युच्यूअल फंड गुंतवणुकीचा 27 तर गृहकर्ज विभागाचा 13 टक्के वाटा आहे.

आगामी काळात गृहवित्तचे नफ्यातील योगदान उंचावेल

आमच्या व्यवसाय प्रारूपाचे विविध क्षेत्रात विस्तारीकरण करताना उत्पन्नात एकसमान योगदान देणाऱया क्षेत्रांनी उत्तम कामगिरी दाखविली आहे. नवीन क्षेत्राकडून उत्पन्नात सर्वाधिक योगदान दिले जात आहे, त्यापैकी मालमत्ता आणि वित्त व्यवस्थापन व्यवसायाचा नफ्यात सर्वाधिक वाटा असून गृहवित्त पुरवठा विभाग नफ्यात आता वेगाने योगदान देत आहे. नवीन टीमच्या नेतृत्वाखाली आगामी काळात गृहवित्त विभागाचे नफ्यातील योगदान आणखी उंचावेल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला.

 

Related posts: