|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » औरंगाबादेत दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू

औरंगाबादेत दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादच्या वडोद बाजार परिसरातील गिरजा नदी पात्रात दोन शाळकरी मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. काल दुपारी हे विद्यार्थी दप्तर शाळेत ठेवून नदी आणि ओढय़ाच्या संगमाजवळ शौचास गेले असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही विद्यार्थी श्री सरस्वती भुवन शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होते. काल दुपारी नदी आणि ओढय़ाच्या संगमाजवळ ते शौचास गेले. त्यावेळी एक जण पाय घसरुन त्या संगमात घडला. मित्राला वाचवण्यासाठी दुसऱया मित्राने पाण्यात उडी घेतली. मित्राला वाचविण्याच्या नादात दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी एक चप्पल सापडल्याने ही घटना उघडकीस आली.

Related posts: