महाड : वाळणकोंडी पुलाजवळ दरड कोसळली

ऑनलाईन टीम /महाड :
महाड वाळण मार्गावरील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळणकोंडी परिसरात काल दोनवेळा दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या परिसरातील नागरिकांचा बिरवाडी व महाड गावांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडून येथील दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सकाळपासून सुरू झाले आहे.
या संदर्भात महाड आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता मागील दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ही दरड व मातीचा भराव रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे वाळण गावात आलेली वस्तीची बस महाडला पोहचू शकली नाही.