|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुलांना वाऱयावर सोडणाऱया पालकांचा जामीन नाकारला

मुलांना वाऱयावर सोडणाऱया पालकांचा जामीन नाकारला 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियमवर आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी या मुलीसह तीन भावंडांना वाऱयावर सोडणाऱया आई-वडिलांना आता अतिरिक्त सत्र न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. आई-वडीलांनी सोडून दिल्याने या भावंडावर भीक मागण्याची वेळ आली होती, या बेफीकीरीबाबत ताशेरे ओढत याआधी बाल न्यायालयानेही या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

  महिनाभरापुर्वी शिवाजी स्टेडीयमवर 8 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराने रत्नागिरी हादरली होती. आई-वडीलांना स्वतःच्या स्वार्थासाठी या तीन भावंडांना वाऱयावर सोडल्याने दिवसभर भीक मागून ही भावंडे रात्री स्टेडियमवर झोपत असत. याचाच घेत एका नराधमाने या आठ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

संबंधित आठ वर्षीय बालिकेची आई आपल्या प्रियकरांबरोबर राहत असल्याने तिने या मुलांना वाऱयावर सोडले होते. आपल्या दोन लहान भावंडांचे हाल होवू नये यासाठी शहरात दिवसभर भीक मागून ती त्यांना खायला देत होती. तर रात्री आश्रयासाठी शिवाजी स्टेडियमवर राहत  होती. प्रियकराच्या घरच्यांना कळू नये यासाठीच तिन्ही मुलांना या दोघांनी मिळून वाऱयावर सोडल्याचे उघड झाले होते.

आई व तिच्या प्रियकरामुळे या मुलांवर भीक मागण्याची वेळ आली व बालिकेवर संकट कोसळल्याचे लक्षात घेवून यापुर्वे बालन्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही आई-वडीलांचा दोघांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. या मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणाऱया आईवडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

 

 

 

Related posts: