|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. दि. 4 ते 10 ऑगस्ट 2019

मेष

मेषेच्या पंचमेशात  मंगळ प्रवेश, मंगळ, प्लूटो षडाष्टक योग होत आहे. धंद्यात अडचणी वाढतील. संयमाने प्रश्न सोडवा. धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. राजकीय- सामाजिक कार्यात तुम्हाला स्थिर मनाने निर्णय घ्यावा लागेल. बोलण्यात एखादी छोटीसी चूक झाल्यास विरोधक त्याचा बाऊ करतील. घरात नाराजी व तणाव होईल. कला, क्रीडा स्पर्धेत कठोर परिश्रम होतील. कोर्टकेस त्रासदायक ठरेल. नोकरीत सहनशीलता ठेवा.


वृषभ

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. मंगळवार, बुधवार रागाचा पारा वाढेल. संयम ठेवा. धंद्यात काम मिळेल. फायदा होईल. राजकीय- सामाजिक कार्यात लोकांचे प्रश्न सोडवता येतील. घरगुती कामे वाढतील. प्रवासात घाई करू नका. नोकरीत वर्चस्व राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. जमिनी संबंधी काम होईल. कोर्टाच्या कामात यश येईल.


मिथुन

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. आत्मविश्वासात भर पडेल. नोकरीत शुक्रवार, शनिवारी अडचण वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे करून घ्या. योजनांच्या मागे लागा, पूर्ण करा. म्हणजे तुमचे स्थान स्थिर राहील. घरातील वातावरण पोषक राहील. मुले प्रगती करतील. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. स्पर्धेत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.


कर्क

सिंह राशीत मंगळ प्रवेश, शुक्र गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक कार्यात चूक सुधारता येईल. योजनांना गती देता येईल. लोकप्रियता मिळेल. उत्साह वाढेल. नोकरीत वरि÷ांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. संसारात सुखद संवाद होईल. परदेशात जाण्याचे ठरवाल. स्पर्धेत पुरस्कार आर्थिक लाभ मिळेल. केस लवकर संपवा.


सिंह

तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जे मिळेल ते काम घेऊन पूर्ण  करा. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर ताशेरे ओढले जातील. वरि÷ांचा दबाव राहील. नोकरीत घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. दादागिरीने फायद्याऐवजी नुकसान होईल. स्पर्धेत प्रति÷ा सांभाळा. तुम्हाला पेचात पकडले जाईल. कोर्टकेस सोपी नाही. शुक्रवार, शनिवारी तणाव.


कन्या

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा वाढेल. कठीण काम करून घ्या. राजकीय- सामाजिक कार्यात महत्त्व वाढवता येईल. लोकप्रियतेत वाढ होईल, असे काम आताच करा. पुढे त्याचा उपयोग होईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीत चांगला बदल होईल. कोर्टकेस संपवा. व्यसन नको.


तुळ

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. फायदा होईल. नवे काम  घेऊन ठेवा. बंधु-भगिनीमध्ये क्षुल्लक वाद संभवतो. राजकीय- सामाजिक कार्याला गती मिळेल. योजना पूर्ण करा. दौऱयात यश मिळेल. रविवार, सोमवार धावपळ होईल. निर्णय सावधपणे घ्या. स्पर्धेत टिकून राहता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.


वृश्चिक

सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात क्षुल्लक वाद मंगळवार, बुधवार होईल. नम्रपणे वागा, प्रश्न सुटेल. कष्ट मात्र पडतील. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे कौतुक होईल. आत्मविश्वासाने स्पर्धेत जिंकाल. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. लोकसंग्रह वाढेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. कोर्टकेस यशस्वी होईल.

धनु

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, शनि षडाष्टक योग होत आहे. धंद्यात  अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरांना सांभाळून ठेवा. भागीदार नाटक करेल. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. लोकांच्या मनात इतर लोक संशय तयार करतील. घरात नाराजी होईल. मनावर दडपण राहील. विरह संभवतो. कला, क्रीडा स्पर्धेत तणाव, अपयश येईल. शुक्रवार, शनिवार प्रकृतीची काळजी घ्या.

मकर

सिंहेत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. फायदा होईल. घरगुती कामे होतील. नाराजी दूर करता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात महत्त्वाचा बदल करता येईल.  डावपेच टाकता येतील.  भविष्यातील यशासाठी आताच प्रयत्न करा. नोकरीत जम  बसेल. कला- क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. लाभ मिळेल. शेअर्सचा अंदाज फायद्याचा ठरेल. कोर्टकेस संपवा. पुढे कठीण होईल.

कुंभ

सिंह राशीत मंगळ प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार धावपळ होईल. कामात अडचण येईल. धंद्यात तडजोड करावी लागेल. शेजारी तुमच्यावर कामाची जबाबदारी देईल. राजकीय, सामाजिक कार्यात, दौऱयात सावध रहा. तुमचा  विचार पटणे कठीण आहे. कला- क्रीडा स्पर्धेत टिकून राहता येईल. नाराज होऊ नका. मित्रांमध्ये तणाव संभवतो. कोर्टकेस त्रासाची वाटेल.

मीन

सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. जम बसवा. मागील येणे वसूल करा. मोठे काम घेऊन ठेवा. मंगळवार, बुधवार धावपळ होईल. कामात अडचण येईल. राजकीय- सामाजिक कार्यात विरोधकाचा सामना करावा लागेल. प्रति÷ा सांभाळता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात टक्कर देऊन यशस्वी व्हाल. कोर्टकेस जिंकता येईल. घरातील कामे होतील. घर, जमीन, खरेदी विक्रीत लाभ होईल.

Related posts: