|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » मुंबईत संततधार; लांब पल्ल्याच्या ‘या’ रेल्वे गाडय़ा रद्द

मुंबईत संततधार; लांब पल्ल्याच्या ‘या’ रेल्वे गाडय़ा रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसाने मुंबई, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिह्यातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे आणि विमान वाहतूकही विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या सायन-कुर्ला दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे. पनवेल ते सीएसएमटी सेवाही विस्कळीत झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरही वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरु आहे.

तर मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, मनमाड-एलटीटी एक्सप्रेस, मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल, मुंबई-भूसावळ पॅसेंजर, मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि भूसावळ-पुणे एक्सप्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

Related posts: