|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » टेक्सासमध्ये बेछूट गोळीबारात 2 ठार, 20 जखमी

टेक्सासमध्ये बेछूट गोळीबारात 2 ठार, 20 जखमी 

ऑनलाईन टीम / एल पासो :

  अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील एल पासो येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 2 जण ठार तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकी वेळेनुसार शनिवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली.

  याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  वॉलमार्ट स्टोअरमध्ये आठवडाभराची खरेदी करण्यासाठी काही लोक आले होते. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षा यंत्रणा याबाबतचा अधिक तपास करत आहे.

Related posts: