|Saturday, December 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » गायत्री दातारचे रंगभूमीवर पदार्पण

गायत्री दातारचे रंगभूमीवर पदार्पण 

‘अलबत्त्या गलबत्त्या’ या यशस्वी नाटकानंतर निर्माते राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटर्सचे “निम्मा शिम्मा राक्षस’’ हे नवे बालनाटय़ लवकरच रंगभूमीवर येत आहे. सध्या रंगभूमीवर तुफान सुरू असलेल्या ‘अलबत्त्या गलबत्त्या’ या विश्वविक्रमी नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. बालमित्रांबरोबरच आबालवफद्धांनाही या नाटकाने प्रेमात पाडले असून एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. अशीच एक अवाढव्य कलाकृती रंगभूमीवर यावी या हेतूने निर्माते राहुल भंडारे, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा “निम्मा शिम्मा राक्षस’’ हया बालनाटय़ासाठी एकत्र आले आहेत.

अद्वैत थिएटर्स निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित “निम्मा शिम्मा राक्षस’’ या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे असून दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले. या नाटकातील तीन गाणी स्वत: चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून जसराज जोशी यांच्या आवाजात आपल्याला ही गाणी ऐकायला मिळणार असून मयूरेश माडगावकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे गायत्री दातार, अंकुर वाढवे आणि मयूरेश पेम हे मुख्य भूमिकेत असून त्यांच्या अभिनयाचा आविष्कार या नाटकात पाहायला मिळेल. त्याचबरोबर इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेत गाजलेले तरुण चेहरे नाटकात असणार आहेत.

Related posts: