|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » काश्मीरमधील कलम 370 हटविले; देशभरातून मोदी सरकारचे स्वागत

काश्मीरमधील कलम 370 हटविले; देशभरातून मोदी सरकारचे स्वागत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

   जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटविण्याची शिफारस आज केंद्रसरकाच्या वतीने राज्यसभेत करण्यात आली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरातून मोदी सरकाचे स्वागत होत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आता राज्य नसून केंद्रशासित प्रदेश असेल.

72 वर्षानंतर काश्मीरची कलम 370 मधून सुटका झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या पूनर्रचनेचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. अमित शाह यांनी आज काश्मीरातील कलम 370 रद्द करणारे विधेयक मांडल्यानंतर राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. काश्मीरमध्ये सध्या करफ्यू आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर राज्यसभेत अमित शाह यांनी 370 हटविण्याची शिफारस केली. सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये होणाऱया हालचाली आणि रविवारी मध्यरात्री काश्मीरमधील नेते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आले आहे.

Related posts: