|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » परिस्थिती सामान्य झाली की जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु : अमित शाह

परिस्थिती सामान्य झाली की जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु : अमित शाह 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत म्हणाले.

– परिस्थिती सामान्य झाली. योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु.

– जम्मू-काश्मीर भारताचं मुकूट मणी आहे.

– मतपेटीच्या राजकारणापलीकडे जाऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती. ती जिगर हवी होती. मोदींनी ती दाखवली. राजकीय इच्छाशक्तीमुळे हा निर्णय होऊ शकला.

– कलम 370 असेपर्यंत काश्मीरमधून दहशतवाद संपू शकत नाही.

– कलम 370 तात्पुरतं आहे हे सर्वांना मान्य आहे. तात्पुरता शब्द 70 वर्ष कसा चालू शकतो.

– जम्मू-काश्मीरच डील पंडित नेहरुंनी केलं. सरदार पटेलांनी केलं नाही. सरदार पटेलांनी जी राज्ये भारतात विलीन केली तिथे कलम 370 नाही.

 

Related posts: