|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजधानीत मिठाई वाटून केला जल्लोष

राजधानीत मिठाई वाटून केला जल्लोष 

प्रतिनिधी / सातारा

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत राजधानी साताऱयात भाजपा व हिंदूत्ववादी संघटनांकडून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडण्यात आले. भाजपाचा विजय असो, मोदींचा विजय असो, अशा घोषणांनी मोती चौक परिसर दणाणू सोडला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजपाचे सातारा शहर चिटणीस विठ्ठल बलशेठवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, विक्रम बोराटे, दत्ताजी थोरात, किशोर गोडबोले, नगरसेविका प्राची शहाणे, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शिंदे, प्रवीण शहाणे, नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, भालचंद्र निकम, जयेंद्र चव्हाण, हर्षल चिकणे, सुनील काळेकर, महेंद्र कदम, गोपाळ शेठ, अमोल कांबळे यांच्यासह मान्यवर या जल्लोषामध्ये सहभागी होते. यावेळी येणाऱया जाणाऱया साताकरांना पेढे आणि लाडू वाटप करण्यात आला. काही नागरिकांनी तर चक्क आमदार शिवेंद्रराजेंना गुलाबाचे फुल दिले.भाजपाने जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी उपस्थितांच्या या जल्लोषामध्ये सातारकरही सहभागी झाले होते. स्वतः आमदार शिवेंद्रराजे हे रिक्षावाले, वाहनधारक यांना मिठाई भरवली. काही वाहनधारकांनी तर हौसेने त्यांच्याकडून मिठाई घेतली.

सरकारचा हा पुर्वनियोजित कट

सरकारने पुर्वनियोजित कट केल्याप्रमाणे पुर्वतयारी करून जम्मू काश्मिरला लष्करी छावणीचे स्वरूप दिले आहे. तिथल्या प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केले. शाळा, कॉलेज बंद केली. अमरनाथ यात्रा रद्द केली. त्यामुळे सरकार काही तरी गंभीर पाऊल टाकणार आहे ही खात्री होती. यासाठी संसदेचे अधिवेशनही लांबवले होते. संसदेमध्ये एखादे विधायक मांडल्यावर त्यावर अभ्यास करायला किमान दोन दिवसांचा अवधी दिला पाहिजे तो सुद्धा दिलेला नाही. सरकारला कशाची भिती होती हे समजत नाही. घटनेतला 370 कलमातील जम्मू कश्मिरशी संबधी भाग आहे तो रद्द केला आहे. जम्मू कश्मिर राज्याचे विभाजन केले असून आस्तित्व संपुष्टात आणले आहे. लडाखला विधानसभा नसणार आहे. जम्मू कश्मिरला विधानसभा असणार आहे. संसदेने राज्याच्या विधानसभेची मंजुरी न घेता हा निर्णय घेतला आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराड दक्षिण विधानसभा

Related posts: