बीएसएनएलचे अनलिमिटेड कॉलिंग रद्द

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येणार नाही. खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ग्राहकांना दरदरोज दिल्या जाणाऱया अनलिमिटेड कॉलिंगऐवजी केवळ 250 मिनिटे कॉलिंग सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 250 मिनिटे संपल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. ‘टेलीकॉमटॉक’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खासगी कंपन्यांसोबत स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनलने आपल्या प्लॅन्समध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला. बीएसएनएलच्या ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगऐवजी केवळ 250 मिनिटे कॉलिंग करता येऊ शकणार आहे. हे नियम काही खास प्लान्सवर लागू असणार आहेत. 186 रुपये, 429 रुपये, 485 रुपये, 666 रुपये आणि 1 हजार 600 रुपयांच्या प्री-पेड प्लानचा यात समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ग्राहकांना एक दिवसात केवळ 250 मिनिटे कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. 250 मिनिटे संपल्यानंतर ग्राहकांना 1 पैसे प्रति सेकंद प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत.