|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल

मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध होत असतानाच, या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. कलम 370 रद्द करण्यासाठी सरकारने कलम 367 मध्ये जी सुधरणा केलेली आहे, ती असंवैधनिक आहे, असं त्यात नमूद केलं आहे.

कलम 370 रद्द करीत जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या मोदी सरकारच्या अत्यंत धडसी विधेयकाने सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कमालीचा गदारोळ निर्माण केला. हे विधेयक राज्यसभेत अवघ्या आठ तासांनंतर मंजूर करून मोदी सरकारने कलम 370 इतिहासजमा केले. या निर्णयाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेत जोरदार विरोध केला. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली.

 

Related posts: