|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » ईपीएफओच्या नियमात मोठा बदल

ईपीएफओच्या नियमात मोठा बदल 

वृत्तसंस्था /मुंबई :

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपूर्वीही ईपीएफओच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार आहे. या व्यतिरिक्त पीएफ खातेही सुरूच राहणार आहे. याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी सरकारने याबाबत आणखी एक नवा निर्णय घेतला असून आता आपल्याला  ऑफलाईन पीएफ काढता येणार नसून ऑनलाईन पद्धतीनेच तो काढावा लागणार आहे. आपला आधार नंबर ईपीएफओशी जोडलेला असल्यास भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम ऑनलाईनही काढता येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑफलाईन परताव्यासाठी गर्दी वाढल्याने प्रादेशिक अधिकारी एन. के. सिंह यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

ऑनलाईन क्लेमसाठीची प्रक्रिया

ऑनलाइन क्लेमसाठी http://www.epfindia.com/site_en/ या संकेतस्थळाला भेट देऊन यूएन नंबर आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्या क्लेमला व्हेरिफाय करून युनिफाइड पोर्टलवर केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

 

Related posts: