|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी भाजप मुख्यालयात

स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी भाजप मुख्यालयात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात ठेवण्यात जाणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या कालावधीत लोकांना भाजप मुख्यालयात स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर लोधी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भाजप कार्यकारीअध्यक्ष जे.इपी. नड्डा यांनी ही माहिती दिली.

स्वराज यांचे आज रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने एका मितभाषी आणि कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी काल रुग्णालयाला भेट दिली आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, विधी व न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोख्रीयाल आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रुग्णालयात स्वराज यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटिरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

Related posts: