|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » रिषभ पंत टीम इंडियाचे भविष्य : विराट कोहली

रिषभ पंत टीम इंडियाचे भविष्य : विराट कोहली 

ऑनलाईन टीम /गयाना : 

टीम इंडियाने वेस्ट इंडीजला तिसऱया आणि अखेरच्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने खिशात घातली. कर्णधर विराट कोहली संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. अखेरच्या लढतीत 65 धावा करणारा युवा फलंदाज रिषभ पंतचं त्यानं भरभरून कौतुक केलं. पंत हा टीम इंडियाचे भविष्य आहे, असं तो म्हणाला.

रिषभ पंतनं अखेरच्या सामन्यात 65 धावांची सुरेख खेळी केली. कर्णधर विराट कोहलीसह त्यानं तिसऱया विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहली म्हणाला, आम्ही पंतकडे टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहतो. त्याच्यात कमालीची क्षमता आणि प्रतिभा आहे. आपण त्याला वेळ द्यायला हवा. त्याच्यावर कोणताही दबाव ठेवायला नको.

 

Related posts: