|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » सुषमा स्वराज यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरूवात

सुषमा स्वराज यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. थोडय़ाच वेळात लोधी रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज दुपारी 12 ते 3 या कालावधीत स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आता स्वराज यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे.

स्वराज यांचे मंगळवारी रात्री एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, विधी व न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोख्रीयाल आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले.

Related posts: