|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » वेबसिरीज चांगले माध्यम : गायकवाड

वेबसिरीज चांगले माध्यम : गायकवाड 

पुणे / प्रतिनिधी : 

 वेबसिरीज हे चांगले माध्यम आहे, आपल्याला त्याबाबत उशिरा कळाले. आपण त्याबाबतीत विकसित होणे आवश्यक आहे, असे मत अभिनेते किरण गायकवाड यांनी मंगळवारी व्यक्त केले.

 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘सांस्प़ृतिक कट्टा’या उपक्रमांतर्गत किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे यांच्याशी संवाद साधण्यात आला. किरण गायकवाड म्हणाले, वेबसिरीज हे चांगले माध्यम आहे. मालिकांना स्वतःचा चाहता वर्ग आहे. त्याचा फरक पडत नाही. नेटफिल्प, यू-टय़ूब यासारखी माध्यम आहे. वेब कंटेट भारी माध्यम आहे. मी रंगमंचावरूनच आल्यामुळे नाटक करायला मला आवडेल. त्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मला कोणताही रोल करायला आवडतो. कुठलेही काम करायला मला कमीपणा वाटत नाही, असेही त्याने नमूद केले.

पूर्वा शिंदे म्हणाल्या, अभिनेत्री व्हायच्याआधी मला आर्मीत जायचे होते. पण, r चुकीच्या माहितीमुळे आर्मीचे करिअर हुकले. भरती होता आले नाही. मी सूत्रसंचालन करायचे. स्पोटर्स खेळायचे. अभिनयाचे माझे प्रशिक्षण झाले नाही, परंतु ‘लागीरं झालं जी’मुळे शिकले. निरीक्षणातून ही शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे इतरांची कामेही पाहत आहे, सुरवातीला खूप दबाव आणि अडचण जाणवली होती. आता हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग यावर जास्त भर देणार आहे.

Related posts: