|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » सुषमा स्वराज अनंतात विलीन

सुषमा स्वराज अनंतात विलीन 

ऑनलाईन टीम  /नवी दिल्ली : 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी त्यांचा अंत्यविधी केला. यावेळी स्वराज यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही.

यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधन नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी उपस्थित होते.

सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले होते. सुषमा स्वराज यांना रात्रा 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.

 

Related posts: