|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » दरड कोसळण्याने आंबोली घाट बंद

दरड कोसळण्याने आंबोली घाट बंद 

ऑनलाईन टीम / आंबोली : 

गेले काही दिवस जोरदार वाऱयासह कोसळणाऱया मुसळधर पावसामुळे सर्वत्र पुरग्रस्त स्थिती असून आंबोली घाट मार्ग ही अतिशय धोकादायक बनला आहे. मंगळवारी आंबोलीपासून तीन किमीवर घाटमार्गात मुख्य धबधबा अलिकडेच मोठी दरड दोन वेळा कोसळली. यात सुदैवाने आंबोली पोलिस कर्मचारी बालबाल बचावले होते. तर त्याच दिवशी याच घाटमार्गात वेगवेगळय़ा आठ ठिकाणी मोठी झाडे, दगड व माती कोसळली होती. यामुळे संपूर्ण घाट मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. तरीही यंदाच्या या पावसाळय़ात ठिकठिकाणी दरडीतील भले मोठे दगड, माती व सर्वत्र झाडे कोसळण्याच्या स्थितीत आले असून ते कधीही कोसळू शकतात. यामुळेच जीव मुठीत धरून वाहन चालक व प्रवासी प्रवास करत आहे. तर बुधवारी रात्री मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर पुन्हा दरड कोसळल्याने आंबोली घाट मार्ग ठप्प झाला आहे.

 

Related posts: