पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले मराठी कलाकार

ऑनलाईन टीम /मुंबई :
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणांपासून, सामान्य नागरिकही मदतीला धावून आले. मराठी कलाकारही नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांनी मदतीसाठी आवाहन केलं आहे.
उमेश कामत, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सुयश टिळक, प्रवीण तरडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला आहे. ज्या कोल्हापूरकर, सांगलीकर रसिकांनी आम्हाला इतकी वर्ष सांभाळलं, प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागू राहू शकत नाही. मराठी नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या मदतीला असतील.’ असं ट्विट कलाकारांनी केलं आहे. तसंच, सामान्य नागरिकांनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.