|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » राज्यसरकारचा निर्णय : पूरग्रस्तांना रोखीने मदत देणार

राज्यसरकारचा निर्णय : पूरग्रस्तांना रोखीने मदत देणार 

ऑनलाईन टीम /मुंबई :

राज्यातील पूरग्रस्तांना बँक खात्यामार्फत मदत देण्याच्या निर्णयावर चहूकडून टीका झाल्यानंतर राज्य सरकारनं निर्णय फिरवला आहे. शक्य असेल तिथं पूरग्रस्तांना रोखीनेच मदत देण्यात येईल,’ असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यातील पूरग्रस्तांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केला आहे. मात्र, हे पैसे कोणालाही रोखीनं दिले जाऊ नये. ती रक्कम संबंधितांच्या बँक बचत खात्यात जमा करावी, असा आदेश राज्य सरकारनं काढला होता. तसा शासन निर्णय (जीआर) 8 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. मात्र, त्यावरून मोठं वादळ उठलं होतं.

 

Related posts: