|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » पूरस्थितीत राजकारण नको, एकत्र येऊन मदत गरजेची : मुख्यमंत्री

पूरस्थितीत राजकारण नको, एकत्र येऊन मदत गरजेची : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम /सांगली : 

पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर आज सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूरग्रस्तांना जाहीर झालेल्या आर्थिक मदतीतही वाढ करून सरकारनं पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच पूरग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचाही आढावा घेतला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. पूरग्रस्तांना सरकारने दिलेल्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. पूरस्थितीवरून कुणीही राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रित येऊन लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या उणिवा विरोधकांनी दाखवाव्यात. पण राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. मदत म्हणून दिलेल्या अन्नधन्याच्या पाकिटावर ‘महाराष्ट्र शासन’ एवढाच उल्लेख असावा, अशा सूचना मी दिल्या आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

Related posts: