|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अतिवृष्टीमुळे एसटीच्या रत्नागिरी विभागाला दिड कोटीचा फटका

अतिवृष्टीमुळे एसटीच्या रत्नागिरी विभागाला दिड कोटीचा फटका 

डिझेल टंचाई कायम, वाशीवरून होतोय पुरवठा दररोज 300 हून अधिक फेऱया रद्द

प्रवीण जाधव / रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यात अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूकीचा अडथळा व अपुरा इंधन पुरवठा याचा चांगलाच फटका रत्नागिरीच्या एसटी विभागाला बसला आह़े जिह्याच्या विविध आगारातून एसटीच्या दररोज 300 हून अधिक फेऱया रद्द करण्याची वेळ आली असून 4 ऑगस्टपासून सुमारे दिड कोटी रूपयांचे नुकसान झाले आह़े अद्याप डिझेलचा पुरवठा पुर्ववत झाला नसून नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े

रत्नागिरी विभागाला 56 हजार लिटर डिझेल लागत़े कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद असल्याने वाशीवरून काही प्रमाणात डिझेल उपलब्ध होत आह़े मात्र तुटपुंजा पुरवठय़ामुळे अनेक फेऱया रद्द करयाची वेळ आली आह़े मंगळवारी रत्नागिरी विभागातील 313 फेऱया रद्द केल्याने 52 हजार किलोमीटरचे प्रवास रद्द झाले. मंगळवारी दापोली आगारामधून 3, खेड मधून 52, चिपळूणमधून सर्वाधिक 74, गुहागरमधून 2, देवरूखमधून 42, रत्नागिरी आगारामधून 14, लांजा मधून 35, राजापूर 64 तर मंडणगड आगारामधून 27 गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्य़ा

पश्चिम महाराष्ट्रातील पुरस्थितीमुळे एसटी विभागाला डिझेलचा पुरवठा करणारे टँकर सांगली येथे अडकून पडले आहेत़ वाशी येथून वाहतुकीमध्ये अधिक वेळ खर्ची पडत आह़े कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग लवकर सुरू न झाल्यास विभागाला आणखी फटका बसू शकत़ो

जिह्यात एसटीच्या फेऱया बंद असल्याने विद्यार्थी व नोकरदार वर्गाची गैरसोय होत आह़े एकीकडे पावसाचा मारा व एसटी बंद असल्याने पायपीट करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आह़े  लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्याने मुंबई, पुणे कोल्हापूर येथे जाणारे प्रवासी गेल्या काही दिवसांपांसून रत्नागिरीत अडकून पडले आहेत़  

लवकरच सेवा पूर्ववत- बोगरे

डिझेलचे टंचाई व रस्ते वाहतूकीमधील अडथळा यामुळे एसटीच्या अनेक फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत़ डिझेलची सांगलीमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद असून वाशी येथून पूरवठा होत आह़े येत्या काही दिवसात डिझेल पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती एसटीचे वाहतूक अधिकारी स़ं ग. बोगरे यांनी दिल़ी

Related posts: