|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत युवतीचा निर्घृण खून

रत्नागिरीत युवतीचा निर्घृण खून 

खेडशीतील जंगलात शेळय़ा चारण्यासाठी गेलेल्या तरूणीची हत्या

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरानजीकच्या खेडशी-गवाणकरवाडी येथील 16 वर्षीय युवतीचा जंगलामध्ये खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर जंगलात शेळय़ा चारण्यासाठी गेलेली युवती सायंकाळी घरी परतली नव्हती. कुटुंबीय व शेजाऱयांनी शोधाशोध केल्यानंतर रात्री 11.30च्या सुमाररास जंगलात तिचा मृतदेह आढळलून आला. डोक्यावर दगड घालून त्या युतीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

  मैथिली प्रवीण गवाणकर (16) असे या युवतीचे नाव आहे. मैथिली ही अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. महाविद्यालयातून आल्यानंतर ती नेहमे घरच्या शेळय़ा चारण्यासाठी दुपारी वाडीपासून काही अंतरावर जंगलात जात असे. शुक्रवारीदेखील ती दुपारी शेळय़ांना चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी सायं. 5.30च्या दरम्यान शेळय़ा घराकडे परतल्या मात्र मैथिली पतरलीच नव्हती. उशिरापर्यंत तिची वाट पाहिल्यानंतर तिचा शोध सुरु करण्यात आला.

   शेळय़ा घरी परतल्या पण मैथिली गायब

   मैथिलीच्या कुटुंबियांनी जंगलात जाऊन तिचा शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. ही बाब शेजाऱया-पाजाऱयांनाही समाजल्यावर तेही जंगलाकडे रवाना झाले. शेळय़ा चारण्यासाठी जाताना मैथिलीकडे मोबाईल होता. त्या मोबाईलचे लोकेशनही खेडशीतील जंगलाकडे दाखवले जात होते. मोबाईलच्या लोकेशनवरून रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

जंगलात मृतदेह पाहून उडाला थरकाप

  एकीकडे मोबाईलच्या लोकेशनचा शोध सुरू होता तर दुसरीकडे गवाणकरवाडी  परिसरात रात्री बॅटऱयांच्या प्रकाशात तिचा शोध घेण्यासाठी गावकरी जंगल पिंजून काढत होते. रात्री 11.30च्या सुमारास त्याच जंगलात एका झुडपाशेजारी मैथिली  निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर जबर जखम पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचा मोबाईल त्याच परिसरात एका बाजूला पडलेला मिळून आला. तिच्यावर प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत होती मात्र डोक्यावरील गंभीर जखम पाहून हा वेगळाच प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे..

ठार मारल्याचा वर्तवला प्राथमिक अंदाज

  या घटनेची खबर ग्रामस्थांनी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने खेडशीकडे रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करताच तिला मारून टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. याप्रकरणी वडील प्रविण सिताराम गवाणकर यांच्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

लवकरच धागेदोरे हाती येण्याची शक्यता

  शनिवारी सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.  प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्यासह पोलीस यंत्रणेने घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. तिच्या मोबाईलवरील कॉल संभाषणाचीही पडताळणी होत आहे. याप्रकरणाची आरोपी लवकरच जेरबंद होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

Related posts: