|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र नामधारी!

मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र नामधारी! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र केवळ नामधारी असल्याचे दिसून येत आह़े  टीवायबीए सहाव्या सत्राचा निकाल जून महिन्यात जाहीर झाल़ा मात्र काही विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेऊन तो जुलै महिन्यात जाहीर करण्यात आला. परंतु या परीक्षेत अनुत्तीण विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्याकंन अर्ज करण्याचा नियम असतानाही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऍानलाईन अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आह़े

 या व्यवस्थेचा फटका बसलेले हे सर्व विद्यार्थी शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामधील आहेत़  विद्यार्थ्यांनी याबाबत प्रथम महाविद्यालयात विचारणा केली. यावेळी ऍानलाईन अर्जाची प्रक्रिया विद्यापीठ स्तरावर असल्यामुळे त्या बाबत रत्नागिरी उपकेंद्रामध्ये चौकशी करा, असे सांगून महाविद्यालयाने आपली जबाबदारी झटकल़ी  विद्यार्थ्यांनी रत्नागिरी उपकेंद्रात धाव घेतली मात्र आठवडाभर मुंबई विद्यापीठाच्या संपर्कात असल्याचे सांगत उपपेंद्राच्या प्रशासनाने केवळ विद्याथ्यची बोळवण केल़ी

  नियमाप्रमाणे निकाल लागल्यानंतर 10 दिवसाच्या आत पुनर्मूल्याकंनासाठी अर्ज सादर करणे आवश्यक असत़े हे माहीत असूनही रत्नागिरी उपकेंद्राचे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना आश्वासन देत राहिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत पुनर्मूंल्याकनाचा अर्ज करता आला नाह़ी परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणाची भीती व्यक्त केली जात आह़े याबाबत उपकेंद्राने तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.