|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ब्रह्मनाळमध्ये आठ मृतदेह सापडले

ब्रह्मनाळमध्ये आठ मृतदेह सापडले 

एकूण मयतांची संख्या वीसवर : सातजण बचावले : 30 जण बोटीत बसल्याचा प्रशासनाचा दावा

प्रतिनिधी / पलूस

ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे बोट उलटून झालेल्या दुर्देवी घटनेतील आज शनिवारी आणखी पाचजणाचे मृतदेह सापडले असून आता मयत झालेल्यांची संख्या सतरा  झाली आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजता ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीच्या महापूरामध्ये अडकलेले 30 नागरिक स्थानिकांच्या मदतीने बोटीतून खटावकडे येत होते. मात्र, सदर बोट झुडुपात अडकून उलटली. यामधील 9 जणांचे मृतदेह त्याचदिवशी सापडले. शुक्रवारी एका मुलीसह तीन जणांचे  मृतदेह  सापडले तर आज  शनिवारी उर्वरित आठजणांचे मृतदेह शोधण्यात शोध पथकाला यश आले आहे.

आज सापडलेले मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळपासून पोलीस, स्थानिक तरूण, एन.डी.आर.एफ.चे जवान तीन बोटींच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेत होते. शुक्रवारी आरोही अण्णासाहेब गडनेट्टी, सुरेखा मधुकर नरुटे, रेखा शंकर वावरे यांचे मृतदेह मिळाले आहेत. तर आज शनिवारी मनीषा दीपक पाटील, क्षीतिजा दीपक पाटील, सुमित्रा संजय रोगे, कोमल मधुकर नरुटे, सौरभ तानाजी गडदे याचे मृतदेह मिळाले. अन्य तिघांची नावे समजू शकलेली नाहीत.

दरम्यान, बोटीमध्ये असलेल्या 23 जणांपैकी एकूण 17 जणांचा मृत्यू झाला असून फक्त सातजण बचावले. अशी अधिकृत माहिती प्रशासनाने दिली. ब्रह्मनाळ गावावर शोककळा पसरली आहे.  आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने व पुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत कार्य करणे सोपे झाले. ब्रह्मनाळ येथील मृतदेह गावातील स्मशानभूमी पाण्याखाली असल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोयीनुसार नातेवाईकांनी मृतदेहावर अत्यसंस्कार केले.

महापुराने केली ताटातूट

महापुराने अनेकांना आई-वडील, भाऊ, बहीण, मुले, पती, पत्नी यांना गमवावे लागले. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबाची ताटातूट केल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, हरिपूर (ता. मिरज) येथे औषधोपचार वेळेत न मिळाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. लिंगाप्पा हंडगी असे वृद्धाचे नाव आहे. बागेतल्या गणपतीजवळ पुराच्या पाण्यात ते अडकले होते. वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत झाला.

Related posts: