|Saturday, December 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » 15 ऑगस्टनिमित्त ‘होम मिनिस्टरचा’ विशेष भाग

15 ऑगस्टनिमित्त ‘होम मिनिस्टरचा’ विशेष भाग 

दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱया महाराष्ट्र पुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंत कनिका यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते मीरारोड येथील शितल नगर येथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी

लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. या वफत्ताने मुंबईसह महाराष्ट्रावर हळहळला होता. तर राणे कुटुंबीयांचा अभिमानही अवघा देश बाळगत होता. आता पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन 7 ऑगस्ट रोजी  एक वर्ष पूर्ण झाले. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दु:खातून स्वत:ला सावरत एका छोटय़ा मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे लाडके भावोजी 15 ऑगस्ट या दिवशी या वीरपत्नीची भेट घेणार असून त्यांच्या या धाडसी वफत्तीला सलाम करून त्यांचा सन्मान करणार आहेत. त्यामुळे होम मिनिस्टरचा एक तासाचा हा विशेष पाहायला विसरू नका 15 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. 

रोहन नाईक, मुंबई

Related posts: