|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कोकण-गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण-गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज 

मध्य महाराष्ट्र-कर्नाटकात जोरदार पाऊस शक्य

पुणे / प्रतिनिधी

पुढील 24 तासांत दक्षिण कर्नाटकात आणि किनारपट्टीच्या भागात तसेच ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर केरळ, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, पश्चिम बंगाल भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

सध्या गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. पूर्व राजस्थान, कर्नाटकाच्या किनारी भागात मान्सून सक्रीय आहे. अरबी समुद्राला उधाण आले असून समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील काही भागात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हय़ातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी 12, 13 आणि 14 ऑगस्टला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत असून सध्या त्याचा जोर मात्र कमी झाला आहे.

Related posts: